मंठा तालुक्यात अवैध गुटखा विक्रेत्यावर छापे, अडीच लाखांचा गुटखा जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील अवैध गुटखा विक्रेत्यांवर पोलिसांची छापा टाकला. छापेमारीत पोलिसांनी अडीच लाखांचा गुटखा जप्त केला आहे.

मंठा तालुक्यातील तळणी रोड व शहरातील एका किराणा दुकानात अवैध गुटखा विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकला. किराणा दुकानातून 28840 रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आणि दुकान मालक अब्दुल रहेमान नबी बागवान विरोधात
मंठा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तर ढोकसाळ येथील हॉटेल लोकसेवा येथे गुटखा होत होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी हॉटेल आणि लोकसेवाच्या मालकीच्या ढोकसाळ येथील शेतात अशा छापे टाकून 1,81,440 रुपयांचा माल जप्त केला आणि आरोपी अलिम सय्यद वर गुन्हा दाखल केला.