
मध्य प्रदेशच्या शिवराज सिंह चौहान कॅबिनेटमधील मंत्रिपदावर असलेल्या इमरती देवी यांना बंगला रिकामा करण्याची नोटिस मिळाली. ज्यानंतर वाद सुरू झाला. इमरती यांना PWD च्या इंजिनिअरने बंगला रिकामा करण्यासाठी नोटिस पाठवली होती. यावर इमरती देवी यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. मात्र संध्याकाळी इमरती यांना बंगला रिकामा करण्याची नोटिस पाठवणाऱ्या इंजिनिअरची बदली करण्यात आली आहे.
इमरती देवी या डबरा विधानसभा संघातून पोटनिवडणुकीत पराभूत झाल्या होत्या. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांना राजीनामा पाठवल्या होत्या मात्र अद्याप मंजूर झालेला नाही. या दरम्यान, PWDने इमरती देवी यांना ग्वालियरच्या झाशी रोडवरील सरकारी बंगल्याला रिकामा करण्यासाठी नोटिस पाठवली. नोटिसमध्ये लिहिले आहे की इमरती देवी यांच्याकडे कोणतेही पद नाही त्यांनी बंगला रिकामा करून PWDकडे सोपवण्यात आला.
इंजिनिअर ओमहरि शर्मा यांनी नोटिस पाठवली होती. नोटिसची कॉपी सोशल मीडियामध्ये व्हायरल झाल्यानंतर वादाला तोंड फुटलं. एडीएम किशोर कन्याल यांनी सांगितले PWDच्या कार्यकारी इंजिनिअरद्वारे विद्यमान मंत्री आहेत. त्यांना बंगला रिकामा करण्याची नोटिस देण्यात आली जे अत्यंत चुकीचे आहे. नोटिस चुकीने धाडण्यात आली आहे कारण इमरती देवी मंत्री आहे आणि मंत्रिपदावर असताना कुणी अशाप्रकारे नोटीस पाठवणे चुकीचे आहे.
यानंतर सायंकाळी आदेश आला की, PWDने कार्यकारी इंजिनिअर ओमहरि शर्मा यांची बदली ग्वालियर येथून भोपाळला करण्यात आली आहे. इमरती देवी या ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या कट्टर समर्थकांपैकी आहेत.
इमरती देवी त्या 22 आमदारांपैकी आहेत ज्यांनी मार्च 2020 मध्ये काँग्रेसमधून राजीनाम देऊन भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता आणि त्यामुळे कमलनाथ सरकार पडले होते. त्यानंतर शिवराज सरकारमध्ये इमरती देवी यांना महिला तसेच बाल विकास मंत्री बनवण्यात आले होते. मात्र पोटनिवडणुकीत डबरा मतदार संघात इमरती देवी यांचा पराभव झाला होता.



























































