
आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) संस्थेने पुन्हा एकदा पाकिस्तानला खैरात दिली आहे. आयएमएफने पाकिस्तानला 1.2 अब्ज डॉलर्सचे (अंदाजे १०,७८२ कोटी रुपये) नवीन कर्ज मंजूर केले आहे. ‘डॉन’ या वृत्तपत्राने मंगळवारी दिलेल्या वृत्तानुसार, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (IMF) कार्यकारी संचालक मंडळाने सोमवारी वॉशिंग्टन येथे झालेल्या बैठकीत दुहेरी ट्रॅक बेलआउटला मंजुरी दिली. यात ३७ महिन्यांच्या विस्तारित निधी सुविधाचा समावेश आहे.
दरम्यान, याआधी आयएमएफने पाकिस्तानला अंदाजे 2.1 अब्ज डॉलर्सची आर्थिक मदत दिली होती. हिंदुस्थानने या आर्थिक मदतीबाबतच्या बोर्ड बैठकीवर बहिष्कार टाकला होता. हिंदुस्थानने म्हटले होते की, पाकिस्तान शेजारील देशांमध्ये दहशतवाद पसरवण्यासाठी आपल्या आर्थिक संसाधनांचा गैरवापर करत आहे. म्हणून त्याला ही आर्थिक मदत देऊ नये.





























































