
>> अभिषेक भटपल्लीवार, चंद्रपूर
टाकळा / तरोटा (Foetid Cassia)
पावसाळ्यात श्रावण महिन्याच्या सुरुवातीला बाजारात रानाभाज्या उपलब्ध होतात. आरोग्यदायक अशा ‘टाकळा / तरोटा’ भाजीची माहिती घेऊ.
कुठे आढळते?
– चंद्रपूर, मुल, सावली, भद्रावती, चिमुर, नागभिड, ब्रह्मपुरी, सिंदेवाही, राजुरा, कोरपना, गोंडपिपरी, पोंभुर्णा
टाकळा भाजीसाठी साहित्य
टाकळा/तरोटा, तेल, बारीक चिरलेला कांदा, मिरची, लसुण, जिरं, तिखट, मीठ, हळद, टोमॅटो, कोथींबीर
टाकळा भाजीची कृती
एका पातेल्यात ग्लासभर पाणी व खुडलेली भाजी उकळा. त्यातील पाणी नितळून घ्या. नंतर एका पातेल्या आवश्यक तेल गरम करून कांदा-मिरची-लसुण-जिरं-तिखट-मीठ-हळद-टोमॅटो परतवा.
नंतर त्यात भाजी टाकून शिजू द्या. मेथीच्या भाजी सारखी किंवा आपल्या आवडीनुसार ही भाजी बनवू शकतात.
औषधी गुणधर्म
टाकळ्याच्या पानांत विरेचन द्रव्य असते. त्वचा रोगांसाठी अत्यंत गुणकारी. मुलांना दात येताना ताप आल्यास पानांचा काढा देतात.
पित्तज, हृदयविकार, श्वसनाचे विकार, खोकला यात पानांचा रस मधातून देतात.





























































