मोदी सत्तेत असेपर्यंत कश्मीर प्रश्न सुटणार नाही

नरेंद्र मोदी हिंदुस्थानचे पंतप्रधान असेपर्यंत कश्मीर मुद्दय़ाकर तोडगा निघण्याची शक्यता नाही असे विधान पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केले आहे. एका वृत्तकाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे मत व्यक्त केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील भाजप सरकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे नाझी विचारांचे अनुकरण करत असल्याचे इम्रान खान यांनी म्हटले. त्यामुळे कश्मीर मुद्दय़ावर आता तोडगा निघण्याची शक्यता नसल्याचे इम्रान खान म्हणाले. मागील काही कर्षांत हिंदुस्थान आणि पाकिस्तान या दोन देशांतील तणाक कायम आहे. पाकिस्तानकडून कश्मीरमध्ये कारंवार शस्त्र्ासंधीचे उल्लंघन होत आहे. मागील वर्षी पुलकामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानसोबतचे संबंध आणखी तणावपूर्ण निर्माण झाले. तर, कश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 रद्द केल्यानंतर पाकिस्तानचा आणखी तिळपापड झाला. आंतरराष्ट्रीय स्तरावरही हिंदुस्थानने पाकिस्तान दहशतवाद्यांना देत असलेल्या पाठिंब्याचा मुद्दा वारंवार उचललेला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या