
सामना ऑनलाईन । इस्लामाबाद
पाकिस्तानने आज जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहरच्या भावासहीत 44 दहशतवाद्यांना अटक केली आहे. ही कारवाई अद्याप संपली नसून आणखी काही दहशतवाद्यांना अटक करण्यात येणार आहे. त्या कारवाईत मसूद अजहरला देखील अटक करण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे येत्या काही तासात मसूदच्या अटकेवर निर्णय घेणार आहेत. अद्याप याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र काही वृत्तवाहिन्यांवर याबाबत माहिती दिलेली आहे.
पुलवामा हल्ल्यानंतर हिंदुस्थानच्या हवाई हल्ल्यामुळे पाकिस्तानचे धाबे दणाणले आहेत. जागतिक स्तरातून देखील हिंदुस्थानला पाठिंबा मिळत आहे. अखेर या दबावापुढे पाकिस्तान झुकला असून मसूद अजहरच्या भावासह 44 दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. यात मसूदच्या मुलाला देखील अटक झाल्याचे समजते.





























































