
सामना प्रतिनिधी । औराद शहाजानी
येथील बालाजी मंदिर यांच्या शेतीमधील विहीरीत मृतदेह आढळला आहे. शेतकर्यांनी तातडीने पोलिसांना माहिती देऊन त्यांना पाचाराण केले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अकस्मात मृत्युची नोंद केली आहे. सदर मृतदेह गावातला रहिवासी सुरेश कांबळे यांचा असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. कांबळे यांची पत्नी व मुले बाहेरगावी राहात असतात त्यामुळे पोलिसांनी पुढील कार्यवाही करुन मृतदेह अंत्यविधीसाठी त्यांच्या कुटुबीयांच्या ताब्यात देत असल्याचे सांगितले. कांबळे यांच्या मृत्यूचे कारण अद्याप कळाले नसून पुढील तपास पोलीस करत आहेत.
































































