आता 10 जानेवारीपर्यंत इन्कम टॅक्स रिटर्न फाइल करता येणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आता 10 जानेवारीपर्यंत इन्कम टॅक्स रिटर्न फाइल करता येणार आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने याआधी इन्कम टॅक्स रिटर्न (आयटीआर) करण्याची मुदत 31 डिसेंबरपर्यंत दिली होती. त्यामध्ये वाढ केली आहे. त्यामुळे अद्याप रिटर्न फाइल न केलेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. व्यक्तिगत टॅक्स भरणाऱयांबरोबरच आर्थिक वर्षात चालू बँक खात्यात एक कोटी रुपयांपर्यंत रक्कम जमा केलेले खातेधारक आणि ज्यांनी विदेशी दौऱयावर दोन लाखांपेक्षा जास्त रक्कम खर्च केली आहे त्यांना इन्कम टॅक्स रिटर्न फाइल करणे बंधनकारक आहे.