खूशखबर! यंदा पगार वाढणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

नोकरदार वर्गाला नव्या आर्थिक वर्षात खूशखबर आहे. एप्रिलनंतर देशभरातील नोकरदारांच्या पगारात घसघशीत पगारवाढ होईल अशी माहिती ‘एओएन सॅलरी इनक्रीज’ने केलेल्या सर्व्हेतून समोर आली आहे. ही वाढ दहा टक्क्यांपर्यंत असणार आहे. देशभरातील नोकरदारांना गेल्या दोन वर्षांत अत्यल्प पगारवाढ मिळाली आहे. त्या पार्श्वभूमीवर एओएनने 20 उद्योगातील एक हजार कंपन्यांमध्ये सर्व्हे करून माहिती घेतली आहे.