IND v NZ head to head – आतापर्यंत कोणाचं पारडं ठरलं आहे वरचढ

767

हिंदुस्थान आणि न्यूझीलंडमध्ये उद्या शुक्रवार, 21 फेब्रुवारीपासून दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. हिंदुस्थानने न्यूझीलंडमध्ये आतापर्यंत 22 कसोटी सामने खेळले गेले आहेत. यात न्यूझीलंडने 8 लढती जिंकल्या, 5 लढती हिंदुस्थानला जिंकता आल्या आहेत. 10 कसोटी सामने अनिर्णित राहिले आहेत. दोन्ही संघाने एकमेकांविरुद्ध 57 कसोटी सामने खेळले आहेत. ज्यापैकी हिंदुस्थानने 21 तर न्यूझीलंडने 10 सामने जिंकले आहेत. तर 26 सामने ड्रॉ झाले होते.

कसोटी मालिका –

test
टीम इंडिया 1967-68 मध्ये पहिल्यांदा न्यूझीलंड दौऱ्यावर गेली होती आणि या दौऱ्यात मन्सुर अली खान पतौडी यांच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने यजमान संघाचा 3-1 असा पराभव केला होता. यानंतर 1975-76 मधील तीन सामन्यांची मालिका 1-1 अशी बरोबरीत सुटली. न्यूझीलंडला हिंदुस्थानविरुद्ध पहिला मालिका विजय मिळवण्यासाठी 1980-81 ची वाट पाहावी लागली. त्यावेळी तीन कसोटी सामन्याची मालिका न्यूझीलंडने 1-0 अशी जिंकला. त्यानंतर 1989-90 ला देखील न्यूझीलंडने 1-0 अशी मालिका आपल्या नावे केली. 1993-94 ला बरोबरीनंतर 1998-99 ची मालिका न्यूझीलंडने 1-0 आणि 2002-03 ची मालिका 2-0 अशी जिंकली. त्यानंतर धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने 2008-09 ची मालिका 1-0 अशी जिंकला. त्यानंतर 2013-14 ची मालिका पुन्हा न्यूझीलंडने 1-0 अशी जिंकली.

मॅक्यूलमची त्रिशतकीय खेळी

brendon-mccullum
न्यूझीलंडकडून सलग 100 कसोटी लढती खेळणारा ब्रँडन मॅक्यूलम पहिला खेळाडू आहे. 2013-14 च्या मालिकेदरम्यान वेलिंग्टनमध्ये झालेल्या लढतीत मॅक्यूलम याने हिंदुस्थानविरुद्ध 302 धावांची त्रिशतकीय खेळी केली होती. पहिला डाव 192 धावांमध्ये गडगडल्यानंतर आणि दुसरा डाव 5 बाद 94 असा संकटात सापडलेला असताना मॅक्यूलम याने 775 मिनिटं किल्ला लढवला आणि त्रिशतक ठोकले. या खेळीदरम्यान त्याने 32 चौकार आणि 4 उत्तुंग षटकार ठोकले होते. मॅक्यूलमने वॉल्टिंगसोबत 352 आणि निशमसोबत 179 धावांची भागिदारी करत संघाची धावसंख्या 8 बाद 680 वर नेऊन ठेवली आणि सामना अनिर्णित राखला.

पहिला विजय

graham-dowling
न्यूझीलंडने टीम इंडियाविरुद्ध कसोटीतील पहिला विजय 1968 ला मिळवला. कर्णधार ग्रॅहम वॉलिंग याने या लढतीत 239 धावांची खेळी केली होती. यात त्याने 26 चौकार आणि 5 उत्तुंग षटकार ठोकले होते. न्यूझीलंडचा संघ पहिल्या डावात 502 धावांवर बाद झाला होता. हिंदुस्थानचा संघ पहिल्या डावात 288 धावांमध्ये गडगडला आणि न्यूझीलंडने फॉलोऑन दिला. दुसऱ्या डावातही हिंदुस्थानचा संघ फक्त 301 धावा करू शकला. हिंदुस्थानने दिलेले 88 धावांचे आव्हान न्यूझीलंडने 6 गडी राखून पार केले होते.

सर्वाधिक धावा

sachin-tendulkar
दोन्ही संघामध्ये आतापर्यंत खेळलेल्या कसोटी सामन्यांमध्ये सर्वांधिक धावांचा विक्रम सचिन तेंडुलकर याच्या नावावर आहे. सचिनने 1990 ते 2009 दरम्यान न्यूझीलंडविरुद्ध 42 लढतींमध्ये 41 डावात फलंदाजी करताना 1750 धावा चोपल्या आहेत. यात त्याच्या 5 शतकांचा आणि 8 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याच्या खालोखाल रॉस टेलर (1385) आणि विराट कोहली (1378) यांचा नंबर लागतो. 2020-21 च्या कसोटी मालिकेत धावांचा पाऊस पाडून सचिनला ओव्हटेक करण्याची संधी दोघांकडे आहे.

सर्वाधिक बळी

srinath-vyanktesh-prasad
गोलंदाजांच्या बाबतीत सर्वात वरच्या स्थानावर जवागल श्रीनाथचे नाव असून 30 कसोटीत त्याच्या नावावर 51 बळींची नोंद आहे. दुसऱ्या नंबरवर अनिल कुंबळे (39 बळी) आणि तिसऱ्या स्थानावर कपिल देव (33) यांचा नंबर आहे. या यादीत सध्या टीम साऊदी 30 बळींसह सहाव्या स्थानावर आहे. किमान अनिल कुंबळे याचा विक्रम मोडण्याची संधी त्याच्याकडे नक्कीच आहे.

आपली प्रतिक्रिया द्या