#INDvPAK विराटचा सल्ला न ऐकल्याने रोहित झाला बाद

सामना ऑनलाईन । मॅनचेस्टर

पाकिस्तानविरुद्धच्या लढतीत टीम इंडियाचा सलामीवीर रोहित शर्माने दणदणीत शतकी खेळी केली. बाद होण्यापूर्वी रोहितने 140 धावा चोपल्या. परंतु रोहितने कर्णधार विराट कोहलीचा सल्ला ऐकला असता तर त्याने दीडशे आणि कदाचित पुन्हा एक द्वीशतकही झळकावले असते. परंतु विराटचा सल्ला न ऐकल्याने रोहितला पवेलियनची वाट धरावी लागली.

‘हिटमॅन’ रोहितचा दमदार फॉर्म कायम, सलग पाचवे अर्धशतक

हिंदुस्थानच्या डावात 39 व्या षटकात रोहितने हसन अलीच्या पहिल्या चेंडूवर चौकार लगावला. पुढचा चेंडू पडण्यापूर्वी विराटने रोहितला फाईन लेगचा खेळाडू 30 यार्ड सर्कलमध्ये आल्याचे सांगितले. परंतु रोहितने विराटच्या या सल्ल्याकडे दुर्लक्ष केले आणि हसनच्या पुढच्या चेंडूवर यष्ट्यांसमोर हटून यष्टीरक्षकाच्या वरून फटका मारण्याचा प्रयत्न केला. परंतु पाकिस्तानने रचलेल्या चक्रव्ह्यूवमध्ये तो फसला आणि 30 यार्डमधील वहाब रियाझ या खेळाडूकडे झेल देऊन तो बाद झाला. विराटने सल्ला देऊनही रोहित तो फटका खेळला आणि बाद झाला. यानंतर रोहित चांगलाच नाराज झाला.

#INDvPAK इतिहास घडला, दिग्गजांना जमले नाही ते रोहित-राहुलने करून दाखवलं

Photo : रोहितचा सचिनला ओव्हरटेक, जलद 24 शतकं ठोकणाऱ्यात चौथा