#INDvWI निर्णायक लढतीपूर्वी टीम इंडियाला धक्का, महत्त्वाचा खेळाडू दुखापतीमुळे बाहेर

1026

टीम इंडिया आणि वेस्ट इंडीजमध्ये मालिकेतील निर्णायक सामना भुवनेश्वर येथे खेळला जाणार आहे. तीन सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघांनी एक-एक लढत जिंकली आहे. त्यामुळे भुवनेश्वरमध्ये दोन्ही संघ मालिका विजयासाठी उतरतील. निर्णायक सामन्यापूर्वी विजयी ट्रॅकवर आलेल्या टीम इंडियाला धक्का बसला असून महत्त्वाचा खेळाडू संघातून बाहेर गेला आहे.

#INDvWI सचिननंतर असा विक्रम करणारा रोहित क्रिकेट विश्वातील दुसराच खेळाडू

बुधावारी झालेल्या लढतीत टीम इंडियाने रोहित शर्मा, लोकेश राहुल यांच्या शतकी खेळीच्या बळावर 387 धावांचा डोंगर उभारला. यानंतर विंडीजच्या संघाला 280 धावांमध्ये गारद करत 107 धावांनी दणदणीत विजय मिळवला. या विजयासह टीम इंडियाने मालिकेत बरोबरी साधली. या विजयामध्ये फलंदाजांसह गोलंदाजांचेही मोठे योगदान राहिले. टीम इंडियाकडून कुलदीप यादव आणि मोहम्मद शमीने सर्वाधिक तीन बळी घेतले. यासह जाडेजा आणि चहरनेही चांगली गोलंदाजी केली.

कुलदीपची ऐतिहासिक हॅटट्रीक! अक्रम, बोल्ट, सकलेन मुश्ताक यांच्या पंक्तीत स्थान

आता टीम इंडिया आणि विंडीजमध्ये अंतिम सामना भुवनेश्वरमध्ये रंगणार आहे. या लढतीपूर्वी टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज दीपक चहरला (Deepak Chahar) दुखापत झाली आहे. दुखापतीमुळे तो निर्णायक लढतीला मुकणार आहे. चहरच्या पाठीला दुखापत झाली आहे. चहरच्या जागी वेगवान गोलंदाज नवदीप सैनी (Navdeep Saini) याची संघात निवड झाली आहे.

अंतिम लढतीसाठी टीम इंडियाचा संघ –
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), मयांक अग्रवाल, के.एल. राहुल, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), शिवम दुबे, केदार जाधव, रविंद्र जाडेजा, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, शार्दुल ठाकूर आणि नवदीप सैनी

#INDvWI दोन्ही कर्णधार ‘गोल्डन डक’, क्रिकेट इतिहासामध्ये विचित्र विक्रमाची नोंद

आपली प्रतिक्रिया द्या