
एजबॅस्टनमध्ये सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने सामन्यावर अगदी मजबूत पकड निर्माण केली आहे. दुसऱ्या डाव 427 धावांवर घोषित करत टीम इंडियाने इंग्लंडला 608 धावांच आव्हान दिलं आहे. मात्र आव्हानाच पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या इंग्लंडची आकाश दीपने भंबेरी उडवली आहे. त्याने इंग्लंडला एका पाठोपाठ एक चार मोठे हादरे देत इंग्लंडच कंबरड मोडलं आहे.
टीम इंडियाने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या इंग्लंडची सुरुवात खराबी झाली. इंग्लंडला पहिला हादरा 11 या धावसंख्येवर साई सुदर्शनने दिला. त्याने झॅक क्रॉलीला भोपळाही फोडू दिला नाही. त्यानेतर बेन डकेट (25), ऑली पॉप (24), जो रूट (6) आणि हॅरी ब्रुक (23) यांना आकाश दीपने आल्यापावली माघारी धाडले. विशेष म्हणजे आकाश दीपने बेन डकेट, ऑली पॉप आणि जो रूट या तिघांचाही त्रिफळा उडवत त्यांना तंबूचा रस्ता दाखवला. त्यामुळे इंग्लंडची अवस्था 83 धावसंख्येवर 5 गडी बाद अशी झाली होती. आता कर्णधार बेन स्टोक्स (10*) जेमी स्मिथ (11*) खेळत असून इंग्लंडला जिंकण्यासाठी अद्याप 504 धावांची गरज आहे. तर टीम इंडियाला जिंकण्यासाठी पाच विकेटची गरज आहे.