IND Vs ENG 2nd Test – कितीही मोठं आव्हान द्या…, इंग्लंडच्या खेळाडूचा टीम इंडियाला इशारा

एजबॅस्टनमध्ये सुरू असलेला दुसरा कसोटी सामना आता अंतिम टप्प्यात आला आहे. टीम इंडियाने पहिल्या डावात 587 धावा केल्या होत्या. प्रत्तुयत्तरात इंग्लंडचा पहिला डाव 407 धावांवर संपुष्टात आला. त्यामुळे टीम इंडियाला 180 धावांची आघाडी मिळाली. इंग्लंडच्या दुसऱ्या डावात हॅरी ब्रुकने जबरदस्त खेळाचे प्रदर्शन करत इंग्लंडचा डाव सावरला. त्याने 234 चेंडूंचा सामना करत 17 चौकार आणि एक षटकार ठोकत 158 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. त्याने जेमी स्मिथसोबत सहाव्या विकेटासठी 303 धावांची भागी केली. त्यामुळे इंग्लंडचा संघ फॉलोऑन वाचवण्यात यशस्वी ठरला.

पहिल्या डावात दमदार फलंदाजी करणाऱ्या हॅरी ब्रुकने आता टीम इंडियाला एक प्रकारे इशारा दिला आहे. आमचा संघ चौथ्या डावात कितीही धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी सज्ज असल्याच तो म्हणाला आहे. BBC वर बोलत असताना हॅरी ब्रुक म्हणाला की, “मला वाटत आहे की आम्ही हा कसोटी सामना जिंकू शकतो. सर्वांना माहित आहे की आम्ही आव्हानाचा पाठलाग करणार, म ते कितीही मोठं असो. आम्ही यापूर्वी असं केलं आहे आणि आताही प्रयत्न करणार. आशा आहे की आम्ही सामन्यावर पुन्हा पकड निर्माण केली आहे.” असं हॅरी ब्रुक म्हणाला आहे.

टीम इंडियाने दुसऱ्या डावात लंच ब्रेकपर्यंत 3 गड्यांच्या मोबदल्यात 177 धावा केल्या आहेत. टीम इंडियाकडे आता 357 धावांची आघाडी आहे. कर्णधार शुभमन गिल (*24) आणि ऋषभ पंत (*41) फलंदाजी करत आहेत. तर यशस्वी जयसवाल (28) आणि करुण नायर (26) झटपट बाद झाले. तर केएल राहुलने 55 धावांची खेळी केली.