
टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यामध्ये चौथा कसोटी सामना मँचेस्टरमध्ये खेळला जात आहे. दिवसाअखेर टीम इंडियाने चार गड्यांच्या मोबदल्यात 264 धावा केल्या आहेत. परंतु टीम इंडियाला सध्या जबरदस्त फॉर्मात असलेल्या ऋषभ पंतच्या स्वरुपात मोठा हादरा बसला आहे. फलंदाजी करत असताना पायाला दुखापत झाल्यामुळे त्याला मैदान सोडून बाहेर जावं लागलं असून त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं आहे.
ऋषभ पंत सध्याच्या घडीला टीम इंडियाच्या मधल्या फळीतील मुख्य आधारस्तंभ आहे. त्यामुळे त्याच्याकडून संघाला भरपूर अपेक्षा आहेत. त्यामुळे त्याला झालेली दुखापत संघाची डोकेदुखी वाढवणारी ठरू शकते. वोक्सच्या गोलंदाजीवर फलंदाजी करत असताना वोक्सने टाकलेला चेंडू खाली राहिला आणि तो थेट पंतच्या पायाच्या बोटाजवळ लागला. त्यानंतर फिजिओला बोलवण्यात आलं आणि फिजिओच्या सल्ल्यानुसार पंतला रिटायर्ड हर्ड करण्यात आलं. त्याला कॅब अॅम्ब्युलन्समधून मैदानाबाहेर नेण्यात आलं. ऋषभ पंतने 48 चेंडूंमध्ये 37 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने 2 चौकार आणि 1 षटकार मारला आहे.
























































