IND VS ENG TEST : इंग्लंडची कासवछाप फलंदाजी, दिवसअखेर 7 बाद 198 धावा

सामना ऑनलाईन । ओव्हल

ओव्हलच्या मैदानावर सुरू झालेल्या पाचव्या कसोटीच्या पहिल्या दिवशी इंग्लंडने कासवछाप फलंदाजी केली. पहिल्या दिवसअखेर इंग्लंडने 90 षटकात 7 बाद 198 धावा केल्या आहेत. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा बटलर 11 आणि राशिद 4 धावांवर खेळत होते.

इंग्लंडकडून सलामीवीर कुकने पहिल्या दिवशी सर्वाधिक 71 धावांची खेळी केली, तर मोईन अलीने 50 धावा केल्या. या दोघांमध्ये दुसऱ्या विकेटसाठी 73 धावांची भागिदारी झाली. कुक बाद झाल्यानंतर इंग्लंडचा डाव कोसळला. इंग्लंडचा कर्णधार रूट, बेअरस्टो आणि करन शून्यावर बाद झाले. हिंदुस्थानकडून इशांत शर्माने 3, जाडेजा आणि बुमराहने प्रत्येकी 2 बळी घेतले.

लाईव्ह अपडेट –

 • इशांत शर्माने 3, जाडेजा आणि बुमराहचे प्रत्येकी 2 बळी
 • बटलर 11 आणि राशिद 4 धावांवर नाबाद
 • दिवसअखेर इंग्लंडच्या 7 बाद 198 धावा

 • पहिल्या दिवसाचा खेळ संपला
 • करन शून्यावर बाद, इशांत शर्माचा तिसरा बळी
 • इंग्लंडला सातवा धक्का

 • अर्धशतकानंतर मोईन अली इशांतच्या गोलंदाजीवर बाद
 • इंग्लंडला सहावा धक्का

 • मोईन अलीचे अर्धशतक
 • जाडेजाच्या गोलंदाजीवर बेन स्टोक्स 11 धावांवर बाद
 • इंग्लंडचा निम्मा संघ माघारी

 • इंग्लंडच्या 150 धावा पूर्ण
 • इशांत शर्माच्या गोलंदाजीवर बेअरस्टो शून्यावर बाद
 • इंग्लंडला चौथा धक्का

 • कर्णधार रुट शून्यावर बाद, बुमराहचा दुसरा बळी
 • इंग्लंडला तिसरा धक्का

 • बुमराहच्या गोलंदाजीवर कुक 71 धावांवर बाद
 • इंग्लंडला दुसरा धक्का

 • कुक 66 आणि मोईन अली 23 धावांवर नाबाद
 • इंग्लंड मजबूत स्थितीत, चहापानापर्यंत 1 बाद 123
 • अलिस्टर कुकचे अर्धशतक

 • इंग्लंडच्या 100 धावा पूर्ण

 • अलिस्टर कुक 37 आणि मोईन अली 2 धावांवर नाबाद
 • लंचपर्यंत इंग्लंडच्या 1 बाद 68 धावा

 • सलामीवीर जाडेजाच्या गोलंदाजीवर 23 धावांवर बाद
 • इंग्लंडचा पहिला धक्का

 • सलामीवीर अॅलिस्टर कुक आणि जेनिंग मैदानात
 • इंग्लंडच्या संघात कोणताही बदल नाही

 • आर. अश्विनच्या जागी रविंद्र जाडेजा आणि हार्दिक पांड्याच्या जागी हनुमा विहारीला संधी

 • हिंदुस्थानच्या संघामध्ये दोन बदल

 • इंग्लंडचा नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय

आपली प्रतिक्रिया द्या