INDvsENG फिरकीपुढे गोऱ्यांची फलंदाजी फुस्स; पटेलचा ‘चौकार’, अश्विनचे तीन बळी

अहमदाबाद कसोटीच्या पहिल्या दिवसाखेर टीम इंडियाने एक गडी गमावून 24 धावा केल्या आहेत. चेतेश्वर पुजारा 15, तर रोहित शर्मा 8 धावांवर नाबाद होता. हिंदुस्थानचा संघ अद्यापही 181 धावांनी पिछाडीवर आहे.

तत्पूर्वी नरेंद्र मोदी मैदानात सुरू झालेल्या अंतिम कसोटी लढतीच्या पहिल्या दिवशी टीम इंडियाने इंग्लंडचा पहिला डाव 205 धावांमध्ये गुंडाळला. इंग्लंडचा संघ पुन्हा एकदा फिरकीच्या जाळ्यात अडकला. लोकल बॉय अक्षर पटेल याने चार बळी घेतले, तर आर. अश्विन याने तीन बळी घेतले. मोहम्मद सिराजच्या खात्यात दोन, तर वाशिंग्टन सुंदरने एक बळी मिळवला.

इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली. मात्र कर्णधार जो रूट याचा हा निर्णय हिंदुस्थानच्या गोलंदाजांनी चुकीचा ठरवला आणि पाहुण्यांना एकामागोमाग एक धक्के दिले. इंग्लंडने आघाडीचे तीन फलंदाज अवघ्या 30 धावांमध्ये गमावले. यानंतर बेन स्टोक्स आणि बेअरस्टो यांच्याच छोटी भागिदारी झाली, मात्र सिराजने बेअरस्टोला बाद करत ही जोडी फोडली.

स्टोक्सचे अर्धशतक

बेअरस्टो बाद झाल्यानंतर स्टोक्स आणि पोप यांची भागिदारी रंगली. या दरम्यान स्टोक्सने अर्धशतक ठोकले. मात्र धोकादायक ठरू पाहणाऱ्या स्टोक्सला वाशिंग्टन सुंदरने बाद केले. बाद होण्यापूर्वी त्याने 6 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 55 धावांची खेळी केली.

लॉरेंसची झुंज

स्टोक्सनंतर फलंदाजीला आलेल्या लॉरेंसने आक्रमक फलंदाजी केली. त्याने 74 चेंडूत 46 धावा करत संघाला 150 धावांचा टप्पा ओलांडून दिला. दुसऱ्या बाजूने पोप 29 धावा काढून बाद झाला. फोक्सही एक धावेवर आल्या पावली मागे परतला. त्यानंतर शेपटाला अधिक वळवळ न करू देता टीम इंडियाने इंग्लंडचा डाव गुंडाळला.

Video – खराब कामगिरीने पाहुणे वैतागले, विराट कोहली व बेन स्टोक्समध्ये मैदानावर बाचाबाची

आपली प्रतिक्रिया द्या