IND vs ENG – जो रूट एकटाच टीम इंडियाला नडला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात हिंदुस्थानच्या पदरी पुन्हा निराशा पडली आहे. इंग्लंडचा जो रूट (99) एकटाच टीम इंडियाला नडला आणि त्याने विजय खेचून हिरावला. पहिल्या सामन्यात दणदणीत विजय मिळवत हिंदुस्थानने 1-0 अशी आघाडी घेतली होती; मात्र दुसऱ्या सामन्यात बाजी मारत इंग्लंडने मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. त्यामुळे रविवारी लॉर्ड्सवर होणाऱ्या तिसऱ्या निर्णायक सामन्याचे महत्त्व वाढले असून या सामन्याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.  पहिला वनडे सामना हिंदुस्थानने सामना खिशात घालून 1-0 अशी आघाडी घेतली होती; मात्र गुरुवारी झालेल्या दुसऱया सामन्यात इंग्लंडने हिंदुस्थानवर चार गडी राखून मात करत मालिकेत बरोबरी साधली.