हिंदुस्थानात 4 लाखांहून अधिक परदेशी नागरिकांचे अवैधरीत्या वास्तव्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संपूर्ण देशात सध्याच्या घडीला 4 लाख 21 हजार 255 विदेशी नागरिक अवैधरीत्या वास्तव्य करीत आहेत. व्हिसा संपल्यावरही राहाणाऱया या विदेशी नागरिकांचा शोध घेण्यासाठी केंद्राच्या सूचनेनुसार गृह विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचा निर्णय राज्याच्या गृह विभागाने घेतला आहे.

व्हिसाची मुदत संपल्यावरही हिंदुस्थानात बेकायदा वास्तव्य करीत असलेल्या विदेशी नागरिकांच्या संदर्भात केंद्रीय गृह सचिवांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. देशात अवैधरित्या राहणाऱया विदेशी नागरिकांचा आढावा घेण्यात आला. देशातील प्रत्येक राज्यात अवैधरित्य वास्तव्य केलेल्या विदेशी नागरिकांचा शोध घेण्याची मोहीम राबवण्याच्या सूचना केंद्रान दिल्या आहेत. त्यानुसार 1 जानेवारी 2011पासून महाराष्ट्रात अवैधरित्या वास्तव्य करीत असलेल्या व बेपत्ता विदेशी नागरिकांचा शोध घेण्यासाठी गृह विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या समितीमध्ये कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलिस महानिरिक्षक, राज्य गुप्तवार्ता विभागाचे आयुक्त, प्रादेशिक विदेशी नागरिक नोंदणी अधिकारी, प्रत्येक जिह्यातील विदेशी नागरिक नोंदणी अधिकारी, व एनआयसी प्रतिनिधींचा समावेश राहिल. या समितीची दर महिन्याला बैठक होईल. त्यानंतर दर महिन्याच्या सात तारखेपर्यंत हा अहवाल केंद्र सरकाला सादर करावा लागणार आहे.