टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियावर 5 गाडी राखून विजय, केएल राहुलने दाखवला क्लास

हिंदुस्थान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना मुंबईत वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला. केएल राहुलच्या धडाकेबाज खेळीच्या जोरावर हिंदुस्थानी संघाने हा सामना जिंकला. त्याने या सामन्यात अर्धशतक झळकावले. हिंदुस्थानी संघाने पाहुण्या ऑस्ट्रेलियाचा 5 विकेट्सने पराभव केला.

या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार पंड्याचा हा निर्णय योग्य ठरला, कारण हिंदुस्थानी गोलंदाजांनी कांगारू संघाला 188 धावांत गारद केले. मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराजने या सामन्यात प्रत्येकी 3-3 बळी घेतले. जडेजाने 2 विकेट्स घेतल्या, तर त्यानेही फलंदाजीतही के एल राहुलला साथ दिली.

189 धावांचा पाठलाग करताना हिंदुस्थानच्या फलंदाजीची सुरुवात चांगली झाली नाही. इशान किशननंतर विराट कोहली आणि त्यानंतर सूर्यकुमार यादव लवकर बाद झाले. शुभमन गिल स्टार्कचा बळी ठरला. तर हार्दिक पांड्या बाउन्सरवर आऊट झाला. अखेर केएल राहुलने अर्धशतक झळकावत 75 धावा केल्या आणि हिंदुस्थान विजयी झाला.