3 लाखांच्या बजेटमध्ये येते मारुतीची ‘ही’ कार; देते 32.99km मायलेज

5018

हिंदुस्थानी बाजारपेठेत सध्या मध्यमवर्गीय कुटुंबीयांसाठी अनेक परवडणाऱ्या बजेटमध्ये गाड्या उपलब्ध आहे. तुमचा बजेट खूपच कमी आहे आणि तुम्ही नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत आहात? तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आज आम्ही तुम्हाला एका अशा कारबद्दल सांगणार आहोत जी तुमच्या खिशाला परवडणार आहे. हिंदुस्थानी कार निर्माता कंपनी Maruti Suzuki ची ‘Alto’ ही सामन्याची कार म्हणून प्रसिद्ध आहे. आज आम्ही तुम्हाला या कारच्या किंमत आणि फीचर्स बद्दल सांगणार आहोत.

इंजिन आणि पॉवर

Maruti Suzuki Alto मध्ये 796 सीसी 3 सिलिंडर इंजिन देण्यात आले आहे. जे 6000 Rpm वर  35.3kw पॉवर आणि 3500 Rpm वर 69Nm टॉर्क जनरेट करते. याचे इंजिन 5 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन ऑप्शनसह येते.

डायमेंशन

Maruti Suzuki Alto ची लांबी 3445 मिमी, रुंदी 1490 मिमी, उंची 1475 मिमी, व्हीलबेस 2360 मिमी आणि याचे एकूण वजन 1185 किलो आहे. दुसरीकडे, यामध्ये 35-लिटरची इंधन टाकी देण्यात आली आहे.

मायलेज

Maruti Suzuki Alto प्रति लिटर पेट्रोल 22.05 किमीचा, तसेच प्रति किलो सीएनजी 32.99 किमीचा मायलेज देते.

किंमत

Maruti Suzuki Alto ची एक्स शोरूम किंमत  2,88,689 रुपये आहे.

आपली प्रतिक्रिया द्या