लसीकरणात हिंदुस्थानने अमेरिकेला मागे टाकले; आतापर्यंत 32 कोटी 36 लाख डोस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या आठवडाभरापासून म्हणजेच 21 जूनपासून देशात 18 ते 44 या वयोगटासाठीदेखील केंद्र सरकारकडून मोफत लसीकरणाची सुरुवात करण्यात आली. पहिल्याच दिवशी 83 लाख नागरिकांना लस देण्यात आली.

त्यामुळे गेल्या आठवडाभरात लसीकरणाचा वेग वाढला असून आजच्या ताज्या आकडेवारीनुसार हिंदुस्थानने डोसच्या संख्येमध्ये अमेरिकेलाही मागे टाकले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार हिंदुस्थानात आज 28 जून रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत 32 कोटी 36 लाख 63 हजार 297 लसीचे डोस देण्यात आले आहेत. हा जगात सर्वाधिक लसीकरणाचा आकडा असून ही ऐतिहासिक कामगिरी असल्याचे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी म्हटले आहे.