
देशात गेल्या 24 तासांत नवीन 80 हजार कोरोना रुग्णांची भर पडली आहे. ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ आहे. देशात आतापर्यंत 63, 498 जणांचा मृत्यू झाला असून त्यातील 948 जणांचा मृत्यू हा गेल्या 24 तासात झाला आहे.
सध्या देशात 35 लाख 42 हजार 734 रुग्ण असून त्यातील 7,65,302 रुग्ण अॅक्टिव्ह आहेत तर 27,13,934 कोरोनाग्रस्त बरे झाले आहेत. कोरोनाग्रस्तांच्या बरे होण्याच्या टक्केवारीत सातत्याने वाढ होत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही आकडेवारी जाहीर केली आहे. कोरोनाचे वेळीच निदान करण्यासाठी चाचण्यांचे प्रमाण वाढवले आहे.




























































