पुढच्या आठवड्यात लसीकरणाचा मोठा विक्रम होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाविरुद्धच्या लढाईत देशात आता आणखीम एक मोठा विक्रम होणार आहे. पुढील आठवड्यात हिंदुस्थानात लसीकरणाचा 100 कोटींचा टप्पा पार होणार आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी दिली आहे. त्यांनी सांगितलं की, ”ऑक्टोबर महिन्यात देशात 28 कोटींपेक्षा अधिक लसींचे उत्पादन होणार आहे.”

मांडविया म्हणाले की, ”सुमारे 73 टक्के पात्र लोकसंख्येला कोरोनावरील लसीचा किमान एक डोस देण्यात आला आहे. तर सुमारे 29 टक्के लोकसंख्येला दोन्ही डोस देण्यात आले आहेत.” ते म्हणाले, ”राज्यांकडे आता लसीचे आठ कोटींपेक्षा जास्त डोस आहेत. तसेच या महिन्यात कोरोना लसीचे 28 कोटी डोस उपल्बध होती. तर सप्टेंबर महिन्यात 22 कोटी लसीचे डोस उपलब्ध झाले होते. नव्याने उत्पादित होणाऱ्या 28 कोटींपैकी सुमारे 22 कोटी डोस कोविशील्ड लसीचे असतील आणि 60 लाख डोस हे कोव्हॅक्सिनचे असतील.”

मांडविया पुढे म्हणाले की, ”आतापर्यंत सुमारे 97 कोटी डोस दिले गेले आहेत आणि देशात लसीच्या डोसची संख्या पुढील आठवड्यात 19 किंवा 20 ऑक्टोबरपर्यंत 100 कोटीपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.” मिळालेल्या माहितीनुसार, आरोग्य मंत्रालयाची सध्या बूस्टर डोस देण्याची कोणतीही योजना नाही. कारण याबाबत तज्ञांचे मत अद्याप स्पष्ट झालेली नाहीत.