रोहितचे टी-20 कर्णधारपद धोक्यात! हार्दिक पांडय़ाकडे नेतृत्व सोपवण्याची वाढती मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

ऑस्ट्रेलियातील टी-20 विश्वचषकातील अपयशानंतर हिंदुस्थानी संघाच्या कर्णधार बदलाच्या मागणीने जोर धरला आहे. आगामी टी-20 विश्वचषक 2024 मध्ये होणार असून आत्तापासूनच टी-20ची धुरा नव्या कर्णधाराकडे सोपवावी, अशी मागणी केली जात आहे. न्यूझीलंडविरुद्ध सुरू असलेल्या टी-20 मालिकेच्या कर्णधारपदाची धुरा हार्दिक पांडय़ाच्या खांद्यावर देण्यात आली असून त्यालाच कायमस्वरूपी कर्णधार करावे, असे मत काही तज्ञांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे येत्या काळात रोहित शर्माचे कर्णधारपद धोक्यात आले आहे.

ऑस्ट्रेलियाच्या धर्तीवर झालेल्या टी-20 विश्वचषकात उपांत्य फेरीच्या सामन्यात हिंदुस्थानला इंग्लंडकडून लाजिरवाणा पराभव पत्करावा लागला. विश्वचषकातील प्रवास संपल्यानंतर हिंदुस्थानी संघ आणि कर्णधार रोहित शर्मावर सर्व स्तरातून टीका करण्यात येत आहे. त्यात आता गेल्या काही दिवसांपासून टी-20 संघाचा कर्णधार बदलाच्या मागणीने जोर धरला आहे.