हिंदुस्थानच्या डिजिटल स्ट्राइकमुळे चीन घायाळ! अॅपवर बंदी घालताच गुंतवणूकदारांचे हित आठवले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पबजीसह 118 अॅप्सवर बंदी घालताच चीनचे पित्त खवळले आहे. हिंदुस्थानच्या या तिसऱया डिजिटल स्ट्राईकमुळे चीन चांगलाच घायाळ झाला असून या कारवाईमुळे चिनी गुंतवणूकदार व सेवा देणाऱ्या कंपन्याचे हित बाधित झाल्याचा कांगावा चीनने केला आहे.

लडाख सीमेवर घुसखोरी करून हिंदुस्थानी भूभागावर कब्जा सांगणाऱया चीनची आर्थिक कोंडी करण्यासाठी हिंदुस्थानने सुरूवातीला टिकटॉकसह 47 अॅपवर बंदी घातली होती. त्यानंतर जुलैमध्ये आणखी अॅपवर बंदी घालण्यात आल. राष्ट्रीय सुरक्षेकच्या कारणासस्तव हा निर्णय घेण्यात आल्याचे सरकारकडून सांगण्यात आले होते. अॅप्सवर बंदी घालण्यात आल्यामुळे चीनला जबर आर्थिक फटका बसला.

बुधवारी बंदी घालण्यात आलेल्या 118 अॅपमुळे देशाचे सार्कभौमत्क तसेच अखंडतेला धोका निर्माण झाला होता. असे माहिती मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे. अनेक तक्रारी मिळाल्यानंतर त्याची सर्वकश चौकशी करण्यात आली. त्यात हे अॅप्स मोबाईलधारकांचा डाटा चोरत असल्याचे आढळून आले होते असेही या निवेदनात म्हटले आहे.