
गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने घट होत असताना पुन्हा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. गेल्या 24 तासात 47 हजारहून अधिक रुग्ण आढळले आहेत.
गेल्या 24 तासात 47 हजार 905 रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे देशातील एकूण रुग्णांची संख्या 86 लाख 83 हजार 916 वर पोहोचली आहे. असे असले तरी आतापर्यंत 80 लाख 66 हजार 501 रुग्ण बरे झाले आहेत.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार गेल्या 24 तासात 550 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण मृतांचा आकडा 1 लाख 28 हजार 121 वर पोहोचला आहे.
देशात सध्या 4 लाख 89 हजार 294 सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. देशात सध्या 5.63 टक्के सक्रिय रुग्ण आहेत. देशात कोरोना बरे होण्याचे प्रमाण 92.89 वर पोहोचला आहे. तर मृत्यूदर हा 1.48 टक्के इतका आहे.
























































