
पोलंडचे मुंबईतील वाणिज्यदूत डेमियन ईरझॅक यांनीदेखील शुक्रवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली. हिंदुस्थान आणि पोलंड दरम्यान थेट विमानसेवा सुरू झाल्यास उभय देशांतील प्रकासाला लागणारा वेळ कमी होऊन व्यापार, उद्योग व पर्यटनाला मोठी चालना मिळेल. त्यामुळे हिंदुस्थानातून पोलंडला थेट विमानसेवा सुरू करण्याबद्दल प्रयत्न सुरू असल्याचे डेमियन ईरझॅक यांनी सांगितले. दुसऱ्या महायुद्धानंतर पोलंडमधील अनेक निर्वासित मुले हिंदुस्थानात आली होती व कोल्हापूर येथे त्यांना राजाश्रय मिळाला होता, असे डेमियन ईरझॅक यांनी सांगितले. येथे राहून गेलेल्या लोकांपैकी काही लोक आज नक्कदीपार झाले आहेत. त्यांच्या मनात कोल्हापूरबाबत किशेष स्थान असल्याचेही त्यांनी सांगितले. हिंदुस्थानातून युरोपला जाणाऱया पर्यटकांची संख्या मोठी आहे. परंतु पोलंडला फार कमी पर्यटक येतात असे सांगून ही संख्या वाढविण्यासाठी आपण प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

























































