हिंदुस्थानात स्वस्त झाले सॅमसंगचे हे तीन जबरदस्त फोन

सॅमसंग कंपनीने सध्या फोनच्या किंमती कमी करण्याचा सपाटा लावला आहे. A51, A71 आणि A31 या मोठ्या फोनच्या किंमती कमी केल्यानंतर आता सॅमसंगने कमी किमतीचे दर कमी केले आहे. त्यामुळे सॅमसंगच्या ग्राहकांना याचा चांगलाच फायदा होणार आहे.

सॅमसंग कंपनीने M11 आणि M01 हे कमी बजेटचे फोन स्वस्त केले आहेत. सॅमसंगचा M01 हा 3/32 जीबीचा फोन 8400 रुपयांना मिळायचा मात्र आता त्याची किंमत 7999 इतकी झाली आहे. गेल्या महिनाभरात कंपनीने या फोनची किंमत दोनदा कमी केली आहे. विवो व ओप्पो या दोन्ही कंपन्या आठ हजार रुपयांमध्ये 2/32 जीबीचे फोन देतात. त्या तुलनेत आता सॅमसंगने स्वस्त फोन देऊन ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे.

सॅमसंग M11 हा तीन कॅमेरा व 5.7 डिस्प्ले असलेल्या फोनची किंमत कंपनीने 500 ते 1000 रुपयाने कमी केली आहे. कंपनीने M11 3/32 जीबीची किंमत 11 हजारावरून साडे दहा हजारावर आणली आहे. तर M11 4/64 ची किंमत 11,999 वर आणली आहे. कमी किंमतीत सॅमसंगचा तीन कॅमेरा व पाच हजार एमएच बॅटरीचा फोन घ्यायचा असेल तर हा फोन तुमच्यासाठी योग्य पर्याय आहे.

M31 हा वीस हजाराच्या किंमतीतल्या फोनची किंमत देखील कंपनीने कमी केली आहे. या फोनच्या 6/128 जीबीच्या वॅरिएन्टसाठी ग्राहकांना आता 20,499 च्या जागी 19499 भरावे लागणार आहे. तर 8/128 जीबीचा मोबाईल ग्राहकांना 22499 च्या जागी 21499 रुपयांना मिळेल.

आपली प्रतिक्रिया द्या