‘ते हरले पण टेस्ट क्रिकेट जिंकले’, इंग्लंडच्या कर्णधाराकडून कौतुक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । साऊथहॅप्टन

इंग्लंडविरुद्ध टीम इंडियाने साऊथहॅप्टन कसोटी 60 धावांनी गमावली. या कसोटीसह टीम इंडियाने पाच कसोटी सामन्यांची मालिका 3-1 अशी गमावली. या मालिकेतील आणखी एक सामना शिल्लक असून टीम इंडियासाठी हा प्रतिष्ठा जपण्याचा सामना असेल. या कसोटी मालिकेत दोन्ही संघांमध्ये तुल्यबळ लढत झाल्याने कसोटी क्रिकेट अजून जिवंत असल्याचे दिसून आले.

इंग्लंडचा मालिका विजय

साऊथहॅप्टन कसोटी संपल्यानंतर इंग्लंडचा कर्णधार जो रूट म्हणाला की, ‘कसोटी क्रिकेटसाठी हा निर्णय म्हणजे चांगले संकेत आहेत. यामुळे असेच दिसून येते की कसोटी क्रिकेट अजून जिवंत असून अधिक चांगले होत आहे.’ तसेच याचे संपूर्ण श्रेय टीम इंडियाला जाते असेही रूट म्हणाला.

…ती यशोगाथा मोईनऐवजी अश्विनने लिहायला हवी होती!

‘टीम इंडियाने आतापर्यंत जबरदस्त क्रिकेट खेळले आहे. फक्त हाच सामना नाही तर संपूर्ण मालिकेत टीम इंडियाने चांगला खेळ केला. येथील प्रेक्षकांनी देखील पहिल्या आणि चौथ्या कसोटीतील ‘काँटे की टक्कर’ पाहून आनंद व्यक्त केला. या दोन्ही सामन्यात विजय आणि पराभवाचे अंतर अगदीच नगन्य होते. शेवटी कोण जिंकणार याबाबत अंदाज बांधणे अवघड होते,’ असेही रूट म्हणाला.

दबावात चांगला खेळ केला
इंग्लंडच्या संघाचे कौतुक करताना कर्णधार रुट म्हणाला की, ‘आम्ही दबावात देखील चांगला खेळ केला. एकवेळ 190 धावांचे आव्हान आम्ही टीम इंडियासमोर उभारू असे वाटत होते, परंतु आम्ही 230 ते 240 धावांचे आव्हान ठेवले. त्यामुळे टीम इंडियाला या लक्ष्याचा पाठलाग करणे अवघड गेले.’