न्यूझीलंडविरुद्ध वनडे मालिकेसाठी हिंदुस्थानी संघ जाहीर, गिल कर्णधार, बुमराह-हार्दिकला विश्रांती

न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी हिंदुस्थानी क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली आहे. शनिवारी जाहीर झालेल्या संघात कर्णधार शुभमन गिल, उपकर्णधार श्रेयस अय्यर आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज यांचे पुनरागमन झाले आहे. बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाकडून फिटनेस क्लिअरन्स मिळाल्यानंतरच अय्यर खेळण्यास पात्र ठरेल.

यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंतने आपले स्थान कायम ठेवले आहे, तर इशान किशनला संघात स्थान देण्यात आलेले नाही. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि अष्टपैलू हार्दिक पंड्या यांना वर्कलोड व्यवस्थापनाचा भाग म्हणून विश्रांती देण्यात आली आहे. एकदिवसीय मालिकेचा पहिला सामना ११ जानेवारी रोजी बडोद्यामध्ये खेळला जाईल.

हिंदुस्थानी संघ

शुबमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल (यष्टिरक्षक), श्रेयस अय्यर (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, हर्षित राणा, प्रसिद्ध कृष्णा, कुलदीप यादव, रिषभ पंत (यष्टिरक्षक), नितीश कुमार रेड्डी, अर्शदीप सिंग, यशस्वी जैस्वाल.