INDvAUS : ऑस्ट्रेलियाचा 32 धावांनी विजय, मालिकेत कमबॅक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । रांची

शुक्रवारी झालेल्या तिसऱ्या एक दिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने हिंदुस्थानचा 32 धावांनी पराभव केला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने मालिकेत पुनरागमन केले आहे. पहिले दोन सामने जिंकल्यामुळे सध्या हिंदुस्थानचा संघ 2-1 आघाडीवर आहे. ऑस्ट्रेलियाने तिसरा सामना जिंकल्याने मालिकेमध्ये रंगत निर्माण झाली आहे.

ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 313 धावांपर्यंत मजल मारली होती. याचा पाठलाग करताना हिंदुस्थानचा संपूर्ण संघ 48.2 षटकात 281 धावा करू शकला. ऑस्ट्रेलियाकडून कमिन्स, रिचर्डसन, झंपाने प्रत्येकी तीन बळी घेतले, तर लायनने एक बळी मिळवला. मालिकेतील चौथा सामना मोहालीमध्ये रविवारी रंगणार आहे.

  • ऑस्ट्रेलियाचा 32 धावांनी विजय
  • हिंदुस्थानला नववा धक्का, शमी बाद

  • हिंदुस्थानला आठवा धक्का, जाडेजा बाद

  • हिंदुस्थानला सातवा धक्का, शंकर 32 धावांवर बाद

  • अखेरच्या 10 षटकात 87 धावांची आवश्यकता
  • 40 षटकानंतर हिंदुस्थानच्या सहा बाद 227 धावा
  • हिंदुस्थानला मोठा धक्का, शतकानंतर विराट बाद
  • हिंदुस्थानच्या 200 धावा पूर्ण
  • 35 षटकानंतर हिंदुस्थानच्या पाच बाद 191 धावा
  • मालिकेतील सलग दुसरे शतक
  • एक दिवसीय कारकीर्दीतील 41 वे शतक
  • 84 चेंडूत 14 चौकरांसह शतकाला गवसणी
  • विराट कोहलीचे दणदणीत शतक

  • हिंदुस्थानचा निम्मा संघ माघारी, जाधव 26 धावांवर बाद

  • 30 षटकानंतर हिंदुस्थानच्या चार बाद 160 धावा
  • हिंदुस्थानच्या 150 धावा पूर्ण
  • 25 षटकानंतर हिंदुस्थानच्या चार बाद 123 धावा
  • विराट कोहलीचे अर्धशतक

  • हिंदुस्थानच्या 100 धावा पूर्ण
  • 20 षटकानंतर हिंदुस्थानच्या चार बाद 95 धावा
  • हिंदुस्थानला चौथा धक्का, धोनी 26 धावांवर बाद

  • 15 षटकानंतर हिंदुस्थानच्या तीन बाद 57 धावा
  • हिंदुस्थानच्या 50 धावा पूर्ण
  • 10 षटकानंतर हिंदुस्थानच्या तीन बाद 40 धावा
  • धोनी मैदानात, चाहत्यांचा एकच जल्लोष

  • अंबाती रायडू 2 धावांवर बाद

  • पाच षटकानंतर हिंदुस्थानच्या 2 बाद 27 धावा
  • धवनपाठोपाठ रोहित शर्मा 14 धावांवर बाद
  • हिंदुस्थानी खराब सुरुवात, धवन स्वस्तात बाद

  • हिंदुस्थानचा डाव सुरू, शिखर-रोहित मैदानात
  • टीम इंडियासमोर 314 धावांचे आव्हान
  • 50 षटकात 5 बाद 313 धावा
  • ऑस्ट्रेलियाचा धावांचा डोंगर

  • 45 षटकानंतर ऑस्ट्रेलियाच्या पाच बाद 272 धावा
  • ऑस्ट्रेलियाला सलग तीन धक्के, हिंदुस्थानचे कमबॅक
  • कुलदीप यादवचा तिसरा बळी
  • ऑस्ट्रेलियाचा पाचवा धक्का, हॅण्डस्कॉम्ब शून्यावर बाद

  • ऑस्ट्रेलियाचा चौथा धक्का, मार्श बाद

  • धोकादायक मॅक्सवेल 47 धावांवर बाद
  • ऑस्ट्रेलियाला तिसरा धक्का

  • ऑस्ट्रेलियाच्या 250 धावा पूर्ण
  • 40 षटकानंतर ऑस्ट्रेलियाच्या दोन बाद 244 धावा
  • ख्वाजा 104 धावांवर बाद
  • ऑस्ट्रेलियाला दुसरा धक्का, शतकानंतर ख्वाजा बाद

  • ऑस्ट्रेलियाची मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल
  • एक दिवसीय कारकीर्दीतील पहिले शतक
  • उस्मान ख्वाजाचे दणदणीत शतक (11 चौकार आणि एक षटकार)

  • 35 षटकानंतर ऑस्ट्रेलियाच्या एक बाद 208 धावा
  • ऑस्ट्रेलियाच्या 200 धावा पूर्ण
  • कुलदीप यादवने मिळवून दिले पहिले यश
  • ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का, फिंचचे शतक हुकले

  • दोन्ही सलामीवीर शतकाच्या उंबरठ्यावर
  • 25 षटकानंतर ऑस्ट्रेलियाच्या बिनबाद 186 धावा
  • ऑस्ट्रेलियाच्या 150 धावा पूर्ण
  • 25 षटकानंतर ऑस्ट्रेलियाच्या बिनबाद 156 धावा
  • 20 षटकानंतर ऑस्ट्रेलियाच्या बिनबाद 124 धावा
  • फिंचपाठोपाठ उस्मान ख्वाजाचे अर्धशतक

  • सलामीवीर अॅरॉन फिंचचे अर्धशतक

  • ऑस्ट्रेलियाची दमदार सुरुवात, बिनबाद 100 धावा
  • केदार जाधवने एकाच षटकात टाकले दोन वाईड बॉल
  • दहा षटकानंतर ऑस्ट्रेलियाच्या बिनबाद 52 धावा
  • पाच षटकानंतर ऑस्ट्रेलियाच्या बिनबाद 20 धावा
  • बुमराहकडून दुसरी ओव्हर संपली, ओव्हरमध्ये 14 धावा

  • हिंदुस्थानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय