
सामना ऑनलाईन,लीडस्
गोलंदाजांची झालेली धुलाई आणि त्यानंतर फलंदाजीत मधल्या फळीचा झालेला फ्लॉप शो त्यामुळे दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात ‘टीम इंडिया’ला मानहानीकारक पराभव पत्करावा लागला. आता तिसरी व अखेरची वन डे जिंकून सलग दहावा मालिकाविजय साजरा करण्याची विराट कोहलीच्या सेनेला संधी असेल. दुसरीकडे निर्णायक वन डेत बाजी मारून मालिका जिंकण्यासाठी इंग्लिश आर्मीही सज्ज झाल्याने क्रिकेटशौकिनांसाठी ही लढत म्हणजे एक पर्वणीच असणार आहे.
‘झिम्बाब्वे, न्यूझीलंड (दोन वेळा), इंग्लंड, वेस्ट इंडीज, श्रीलंका (दोन वेळा), ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिका या संघांना मायदेशात आणि त्यांच्या मैदानावरही हरविण्याचा पराक्रम हिंदुस्थानने केला आहे.




























































