टीम इंडियाचा विंडीजवर विक्रमी विजय; विराटची धोनीशी बरोबरी

493
test-team-india

टीम इंडियाने वेस्ट इंडीज विरुद्धच्या पहिल्या कसोटीत त्यांना 318 धावांच्या फरकाने पराभूत करत प्रचंड मोठा विजय मिळवला आहे. या विजयात अजिंक्य रहाणे याने महत्वाची भूमिका बजावली. अजिक्य रहाणेचं दमदार शतक आणि त्यांनतर जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, शमी यांच्या भेदक गोलंदाजीची पुढे विंडीजचं काही चाललं नाही. त्यामुळे कसोटीच्या चौथ्या दिवशीच टीम इंडियाने विंडीजला दुसऱ्या डावात अवघ्या 100 धावांत गुंढाळत धूळ चारली. हिंदुस्थानचा विदेशी दौऱ्यातील हा सर्वात मोठा विजय आहे. याआधी टीम इंडियानं 2017 मध्ये श्रीलंकेला 307 धावांनी पराभूत केलं होतं.

कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडियाला हा मोठा विजय मिळाला आहे. या विजयासोबतच विराटनं विदेशी भूमीवर विजय मिळवण्यात माजी कर्णधार धोनीसोबत बरोबरी केली आहे तर माजी सौरव गांगुलीला पिछाडीवर टाकलं आहे. कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडियाला हा मोठा विजय मिळाला आहे. या विजयासोबतच विराटनं विदेशी भूमीवर विजय मिळवण्यात माजी कर्णधार धोनीसोबत बरोबरी केली आहे तर माजी सौरव गांगुलीला पिछाडीवर टाकलं आहे. विराटच्या नेतृत्वात टीम इंडियाने विदेशात 47 कसोटी सामने खेळले आहेत. ज्यापैकी 27 मध्ये विजय मिळला आहे. धोनीच्या नेतृत्वात टीम इंडियाने विदेशात 60 कसोटी सामन्यात 27 विजय मिळवले होते. तर गांगुलीच्या नेतृत्वात विदेशात खेळताना 49 पैकी 21 सामन्यात टीम इंडियाने विजय मिळवला होता.

आपली प्रतिक्रिया द्या