
अरुणाचल प्रदेशातील पश्चिम कामेंग जिल्ह्यातील मांडलाजवळ गुरुवारी सकाळी 9:15 च्या सुमारास लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले. या अपघातात हेलिकॉप्टरचा पायलट आणि सहवैमानिकाचा मृत्यू झाला आहे. ‘चित्ता’ हेलिकॉप्टरचा संपर्क तुटल्यानंतर लेफ्टनंट कर्नल व्हीव्हीबी रेड्डी आणि मेजर जयंत ए. बेपत्ता असल्याची माहिती मिळाली होती. लष्कराच्या म्हणण्यानुसार, सकाळी 9:15 वाजता हेलिकॉप्टरचा हवाई वाहतूक नियंत्रकाशी संपर्क तुटला. यानंतर हेलिकॉप्टरच्या शोधासाठी लष्कर, सशस्त्र सीमा बल आणि इंडो-तिबेटन बॉर्डर पोलिसच्या पाच शोध पथकांना पाठवण्यात आले.
यानंतर हेलिकॉप्टरचे अवशेष मांडला येथील बांगलाजप गावाजवळ सापडले. लष्कराकडून आता अपघाताचे कारण शोधले जाणार आहे. हेलिकॉप्टरने सांगे गावातून सकाळी 9 वाजता उड्डाण केले आणि ते आसाममधील सोनितपूर जिल्ह्यातील मिसामरीकडे जात होते. त्यात एक लेफ्टनंट आणि एक मेजर उपस्थित होते. सकाळी 9.15 च्या सुमारास हेलिकॉप्टरचा एअर ट्रॅफिक कंट्रोलशी संपर्क तुटला.



























































