युझवेंद्र चहलचे इन्स्टाग्राम अकाउंट हॅक, खाजगी चॅट लीक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर युजवेंद्र चहलचे इन्स्टाग्राम अकाउंट हॅक झाले आहे. अकाउंट हॅक केल्यानंतर हॅकरने त्याच्या खासगी चॅटचा स्क्रीनशॉटही सार्वजनिक केला आहे. हॅकरने स्वतःची ओळख देखील उघडपणे जाहीर केली आहे.

चहल सध्या इंडियन प्रीमियर लीग मध्ये राजस्थान रॉयल्स संघाचा भाग आहे. मात्र राजस्थान रॉयल्सनेच चाहलचे इन्स्टाग्राम अकाउंट हॅक केले आहे. आयपीएल 2022 दरम्यान, चहलने राजस्थान रॉयल्सचे इंस्टाग्राम अकाउंट हॅक केले होते. यावेळी त्याने संघातील अनेक खेळाडूंना त्या अकाउंट वरून संदेश पाठवले होते. त्याचा बदला राजस्थान रॉयल्सने घेतल्याचे म्हटले आहे.

हे सर्व मनोरंजनासाठी केले असल्याचे राजस्थान रॉयल्सचे म्हणणे आहे. राजस्थान रॉयल्सने शेअर केलेल्या चहलच्या इन्स्टा चॅटच्या स्क्रीनशॉटमध्ये, त्याची पत्नी धनश्री वर्मा चहल, संजू सॅमसन, महेंद्रसिंग धोनी, जोस बटलर, हिंदुस्थानी क्रिकेट संघ आणि रोहित शर्मा यांच्या खात्यावरील शेवटचे संदेश दाखविले आहेत.