ऑलिम्पिकआधी धक्का;  ‘वाडा’कडून हिंदुस्थानच्या डोपिंग लॅबवर बंदी

169

2020 सालामध्ये टोकियो येथे होणाऱया ऑलिम्पिकआधीच हिंदुस्थानातील उत्तेजके द्रव्य सेवनविरोधी चाचणी चळवळीला धक्का पोहोचला आहे. ‘वाडा’ या जागतिक संस्थेने नवी दिल्लीतील राष्ट्रीय डोप टेस्ट लॅबोरेटरीवर सहा महिन्यांच्या बंदीची शिक्षा सुनावली आहे.

‘वाडा’चे पथक नवी दिल्लीतील लॅबमध्ये पाहणी करण्यास आले होते. त्या दौऱयादरम्यान या लॅबमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे ‘वाडा’कडून सहा महिन्यांच्या बंदीचा निर्णय घेण्यात आला. मात्र हिंदुस्थानातील राष्ट्रीय संस्था ‘नाडा’ यांना अजूनही खेळाडूंची डोपिंग चाचणी घेण्याचा अधिकार आहे. पण ‘वाडा’शी संलग्न असलेल्या परदेशातील लॅबमध्ये हे नमुने घेऊन जावे लागणार आहेत. ‘वाडा’कडून असा आदेश देण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या