
भारत-पाकिस्तान युद्धविरामाच्या घोषणेनंतर देशाचे परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले. समाजपंटकांनी मिस्त्राr यांचे जुने पह्टो शेअर करत त्यांच्या कुटुंबातील सदस्यांबद्दल अपमानास्पद कमेंट केल्या आहेत. राष्ट्रीय महिला आयोगाने यांची गंभीर दखल घेतली असून परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी आणि त्यांच्या कुटुंबीयांवरील व्यक्तिगत टीकाटिप्पणी कदापि सहन केली जाणार नसल्याचे म्हटले आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सुरू करण्यात आलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’चा आवाज म्हणून भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री, कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग सगळय़ांसमोर आले. युद्धविरामानंतर समाजकंटकांनी विक्रम मिसरी यांना ट्रोल करायला सुरुवात केली. मिसरी यांच्या मुलीची माहिती उघड करत तिच्यावरही आक्षेपार्ह टिप्पणी सुरू केली आहे.
आतापर्यंत तीन पंतप्रधानांसोबत विक्रम मिसरी यांनी केलेय काम
विक्रम मिसरी हे आता 60 वर्षांचे आहेत. त्यांनी तीन पंतप्रधानांबरोबर काम केलंय. 1989 मध्ये ते भारतीय परराष्ट्र सेवेत रुजू झाले. 1991-1996 या काळात त्यांनी ब्रसेल्स आणि टय़ूनिसमध्ये त्यांनी विविध जबाबदाऱया सांभाळल्या. 1997 मध्ये पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल यांचे प्रायव्हेट सेव्रेटरी म्हणून काम करताना त्यांनी पंतप्रधान कार्यालय आणि परराष्ट्र मंत्रालयात अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱया सांभाळल्या. 2012 मध्ये मिसरी हे पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे प्रायव्हेट सेव्रेटरी झाले. 2014 मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी आल्यानंतर मिसरी यांनी आधी स्पेनमध्ये आणि त्यानंतर म्यानमारमध्ये भारताचे राजदूत म्हणून काम पाहिले. 2019 मध्ये चीनमधले भारताचे राजदूत म्हणून त्यांची नियुक्ती झाली. जून 2024 पासून ते भारताचे 35 वे परराष्ट्र सचिव म्हणून कार्यरत आहेत.
नैतिकदृष्टय़ाही चुकीचे
मिसरी आणि कुटुंबीयांतील सदस्यांवर व्यक्तिगत टीका करणे नैतिकदृष्टय़ाही चुकीचे आहे. व्यक्तिगत टीकाटिप्पणी कदापि सहन केली जाणार नाही. आपण सर्वांनी सभ्यता आणि संयमित वर्तणूक दाखवली पाहिजे. आपण यातून पुढे गेलं पाहिजे, असे राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी परिपत्रकात म्हटले आहे.
मिसरी यांनी ट्विटर अकाऊंट केले प्रोटेक्ट
गद्दार, देशद्रोही अशा शब्दांचा प्रयोग करत ट्रोलर्सनी मिसरी यांच्यावर आगपाखड करण्यात आली. हद्द म्हणजे मिस्त्र्ााr यांची मुलीबद्दल ट्रोलर्सकडून आक्षेपार्ह भाषेचा वापर करण्यात आला. त्यातूनच व्यथित झालेल्या विक्रम मिसरी यांनी आपलं ट्विटर अकाऊंट प्रोटेक्ट केलं आहे.
मोदी भक्तांकडून मिस्त्री कुटुंबीय ट्रोल -रोहित पवार यांचा आरोप
पत्रकार परिषदेच्या माध्यमातून पाकिस्तानला उघडं पाडण्याचं काम परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री हे अत्यंत प्रभावीपणे करत आहेत. पण त्यांनी शस्त्रसंधीची माहिती देताच चवताळून पिसाळल्यागत उठलेल्या ‘भक्त’मंडळींकडून मिस्त्री आणि त्यांच्या कुटुंबातील महिलांबाबत आक्षेपार्ह टिप्पणी अत्यंत संतापजनक असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे. शस्त्रसंधीचा निर्णय हा प्रशासनात काम करणाऱया मिस्त्री यांचा नाही तर राजकीय पातळीवर सरकारकडून घेतला गेला. तो केवळ जाहीर करण्याची जबाबदारी मिस्त्री यांच्यावर होती, परंतु आपल्याच नेत्याविरोधात बोलण्याची वेळ येताच नांगी टाकणारे हे ट्रोलर्स मिस्त्री आणि त्यांच्या कुटुंबीयांना टार्गेट करतायेत. मिस्त्री यांच्यासारख्या प्रामाणिक अधिकाऱ्यांचे मनोबल खच्ची होऊ नये यासाठी या ‘अंधभक्त’ ट्रोलर्स आणि त्यांच्या पाठीशी असलेल्या मेंदूवर सरकारने कठोर कारवाई करावी! ही बाब सरकारपर्यंत पोचली की नाही माहीत नाही, पण सरकारपर्यंत पोचल्यावर पंतप्रधान मोदी हे या ट्रोलर्सवर नक्की कठोर कारवाई करतील, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.