भारतीय विमा कर्मचारी सेना एलआयसी युनिटचा मदतयज्ञ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सुरू असलेल्या मदतकार्यात भारतीय विमा कर्मचारी सेना एलआयसी युनिटने देखील मोलाची भूमिका निभावली आहे. युनिटच्या वतीने शिवसेना खासदार व भारतीय विमा कर्मचारी सेना महासंघाचे सरचिटणीस अनिल देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतेच जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यात तब्बल 500 शेगडय़ांसह, 250 एलईडी टय़ुब आणि 250 स्टील भांडय़ांसह इतर साहित्यांचे वाटप करण्यात आले आहे.

चिपळूण येथील स्वामी मंगल सभागृहात या मदत वाटपाचा कार्यक्रम नुकताच पार पडला. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन कदम, माजी आमदार सदानंद चव्हाण, भारतीय विमा कर्मचारी सेनेचे अध्यक्ष माजी आमदार सुनील शिंदे, तालुकाप्रमुख प्रताप शिंदे, भारतीय विमा कर्मचारी सेनेचे कार्याध्यक्ष उपविभागप्रमुख गोपाळ शेलार, पंचायत समिती सदस्य राकेश शिंदे, ऋतुजा पवार, भारतीय विमा कर्मचारी सेनेचे पश्चिम क्षेत्र विभागाचे अध्यक्ष अनंत वाळके, कार्याध्यक्ष शरद एक्के, सरचिटणीस दीपक मोरे आदी उपस्थित होते.

भारतीय विमा कर्मचारी सेना एलआयसी युनिटने केलेली ही मदत खूप महत्त्वाची आहे. चिपळूणकरांच्या पाठीशी विमा कर्मचारी सेना आणि एलआयसीतील कर्मचारी उभे राहिल्याबद्दल जिल्हाप्रमुख सचिन कदम व माजी आमदार सदानंद चव्हाण यांनी आभार मानले. यावेळी भारतीय विमा कर्मचारी सेनेच्या पदाधिकाऱयांनाही पूरग्रस्तांशी संवाद साधला. विशेषकरून आदिवासी पाडय़ातील नागरिकांना मदत मिळाल्याबद्दल अध्यक्ष सुनील शिंदे आणि कार्याध्यक्ष गोपाळ शेलार यांनी समाधान व्यक्त केले.