Ratnagiri News – रत्नागिरीत वैद्यकीय सेवा बंद ठेवत डॉक्टरांचे आंदोलन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

होमिओपॅथीच्या पदवीधर डॉक्टरांची नावे मॉर्डन मेडिसीन करिता बनलेल्या रजिस्टारमध्ये नोंदविण्यास विरोध करत आज, 06 ऑगस्ट 2026 इंडियन मेडिकल असोसिएशनच्या रत्नागिरी शाखेने बेमुदत वैद्यकीय सेवा बंद आंदोलन सुरू केले आहे. अत्यावश्यक सेवा वगळून ओपीडी बंद ठेवण्यात आल्या होत्या.

मॉर्डन मेडिसीन करिता बनलेल्या रजिस्टारमध्ये होमिओपॅथीच्या पदवीधर डॉक्टरांची नावे नोंदविण्यास एमबीबीएस आणि पदव्युत्तर पदवी डॉक्टरांनी विरोध केला आहे. डॉक्टरांनी विरोध करूनही होमिओपॅथी डॉक्टरांची नावे रजिस्टरमध्ये घेण्यास शासनाने सुरुवात केली आहे. त्यामुळे इंडियन मेडिकल असोसिएशनच्या महाराष्ट्र राज्य संघटनेने आज राज्यव्यापी आंदोलन पुकारले होते. त्या आंदोलनाला हाक देत इंडियन मेडिकलच्या रत्नागिरी शाखेने आंदोलनात सहभाग घेत वैद्यकीय सेवा बंद ठेवली. इंडियन मेडिकल असोसिएशनने रत्नागिरी अध्यक्ष डॉ. निनाद नाफडे यांनी सांगितले की, आमच्या संघटनेचे सर्व डॉक्टर आंदोलनात सहभागी झाले आहेत. फक्त अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यात आल्या आहेत.