
नवी दिल्लीतील इंदिरा गांधी विमानतळावर सीमा शुल्क विभागाच्या एअर इंटेलिजन्स युनिटने शुक्रवारी 3 हजार 565 ग्रॅम सोन्याची बिस्किटे जप्त केली. याप्रकरणी हिंदुस्थानी वंशाच्या एका अमेरिकन नागरिकाला अटक केली आहे. आरोपीने अंगावरच्या कपड्यांमध्ये हे सोने लपवले होते. अधिकाऱ्यांनी सर्व सोने जप्त केले आहे.
एनआयने दिलेल्या वृत्तानुसार, हा संशयित प्रवासी सॅन फ्रान्सिस्कोहून एअर इंडियाच्या AI-4174 या विमानाने नवी दिल्लीत दाखल झाला होता. ग्रीन चॅनेलमधून निसटून जाण्याचा प्रयत्न करत असतानाच, अधिकाऱ्यांनी त्याला ताब्यात घेतले. सीमा शुल्क कायदा, 1962 च्या कलम 110 अन्वये हा माल जप्त करण्यात आला असून, सदर प्रवाशाला याच कायद्याच्या कलम 104 अन्वये अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
Delhi | Air Intelligence Unit (AIU) of Customs at Indira Gandhi International Airport intercepted an American national of Indian origin yesterday, recovering 115 gold bars weighing 3,565 grams concealed in specially designed inner pockets of his trousers.
The suspect arrived in… pic.twitter.com/DArH67JojZ
— ANI (@ANI) May 16, 2026


























































