अमेरिकेत हिंदुस्थानी तरुणाला सात महिने डांबून ठेवले, चुलत भावानेचे केला अत्याचार

अमेरिकेत एका 20 वर्षीय हिंदुस्थानी तरुणाला त्याच्या चुलत भावाने व इतर दोघांनी सात महिने एका रुममध्ये डांबून ठेवले होते. पोलिसांनी त्या तरुणाची सुटका केली असून सध्या त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी त्याचा चुलत भाऊ व्यंकटेश आर सत्तारू सह दोन जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

सदर पीडित विद्यार्थी हा अमेरिकेतील मिसूर युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजीमध्ये शिकायला गेला होता. सत्तारू याने या विद्यार्थ्याला एप्रिल महिन्यापासून त्याच्या खोलीत डांबून ठेवलं होतं. इतर दोन आरोपी असलेले श्रावण वर्मा पेनुमेत्वा (24) आणि निखिल वर्मा पेनमत्सा (28) यांच्यासोबत डांबून ठेवले होते. त्यांनी त्याच्या पासपोर्टही खराब करण्यात आला होता. त्याच्यकडून घरातली सर्व कामं करून घेतली जायची. तसंच त्याला मारहाणही केली जायची. या मारहाणीत त्याच्या शरीरातील अनेक हाडांना फ्रॅक्चर झालेलं असतानाही त्याला रुग्णालयात नेण्यात आले नव्हते.

गेल्या काही दिवसांपासून पेनमत्सा यांच्या घरातून तरुणाच्या ओरडण्याचा आवाज येत असल्याची तक्रार काही शेजारच्यांनी दिल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या घरावर धाड टाकली. त्यावेळी पीडित तरुण अत्यंत वाईट अवस्थेत सापडला. या  प्रकरणी पोलिसांनी तिघांनाही अटक केलेली आहे. व्यंकटेश आर सत्तारू हा हिंदुस्थानातील एका राजकीय नेत्याचा नातेवाईक असल्याचे समजते.