‘या’ हिंदुस्थानी क्रिकेटपटूंनी कसोटी पदार्पणातचं ठोकलं शतक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या कसोटी सामन्याच्या पदार्पणातच मुंबईकर पृथ्वी शॉने शतक झळकावत इतिहास रचला आहे. पृथ्वीने चेंडूत त्याचे शतक पूर्ण केले. याआधी देखील 14 हिंदुस्थानी फलंदाजांनी अशा प्रकारचा विक्रम त्यांच्या नावावर केला आहे.

पदार्पणात शतक झळकावणारे हिंदुस्थानी फलंदाज –

1) लाला अमरनाथ  – 

lala-amaranath-1

  • नानिक लाला अमरनाथ उर्फ लाला अमरनाथ हे कसोटी पदार्पणातच शतक ठोकणारे पहिले हिंदुस्थानी फलंदाज ठरले आहेत. 1933 मध्ये बॉम्बे जिमखान्याच्या मैदानावर इंग्लंड विरोधात झालेल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या इनिंगमध्ये अमरनाथ यांनी  119 धावा केल्या होत्या

2) दीपक शोधन

deepak-shodhan-1

  • दीपक शोधन यांनी 1952 मध्ये कोलकाता येथे झालेल्या सामन्यात 110 धावा केल्या होत्या.

3) एजी. क्रिपाल सिंग –

kripal-singh-1

  • 1955 साली क्रिपाल सिंग यांनी न्यू झिलंड विरोधात झालेल्या सामन्यात नाबाद 100 धावा ठोकल्या होत्या.

4) अब्बास अली बैग

abbas-ali

  • अब्बास अली बैग यांनी 1959ला झालेल्या  इंग्लंड विरोधी सामन्यात 112 धावा केल्या होत्या

5) हनुमंत सिंग

hanumant-singh-1

  • हनुमंत सिंग यांनी इंग्लंडविरोधात 1964ला झालेल्या इंग्लंड विरोधी सामन्यात 105 धावा केलेल्या

6) गुंडप्पा विश्वनाथ –

gundappa-vishwanath-1

  • कानपूर येथे 1969साली ऑस्ट्रेलियाविरोधात झालेल्या सामन्यात गुंडप्पा विश्ननाथ यांनी 137 धावा ठोकल्या होत्या

7) सुरिंदर अमरनाथ –

suriander-amarnath-1

  • लाला अमरनाथ यांचा मुलगा सुरिंदर अमरनाथ यांनी ऑकलंडमध्ये न्यूझिलंडविरोधी सामन्यात धडाकेबाज १२४ धावा केल्या होत्या.

8) मोहम्मद अझरुद्दीन

azarddun-1

  •  1984 साली अझरुद्दीन यांनी इंग्लडविरोधात पदार्पणातच 110 धावा केलेल्या.

9) प्रवीण आमरे –

pravin-amre1

  • दर्बन येथे दक्षिण आफ्रिकेविरोधातील सामन्यात आमरेंनी 103 धावा केल्या होत्या

10) सौरव गांगुली –

ganguly

  • सौरव गांगुलीने इंग्लंडमधील लॉर्ड्स मैदानावर 131 धावांची धडाकेबाज खेळी केली होती.

11) विरेंदर सेहवाग

sehwag

  • विरेंदर सेहवागने दक्षिण आफ्रिकेविरोधात 2001 मध्ये 105 धावा केलेल्या.

12) सुरेश रैना

suresh-raina-01

  • रैनाने श्रीलंकेविरोधातील त्याच्या पदार्पणाच्या कसोटी सामन्यात 120 धावा केलेल्या

13)  शिखर धवन –

shikhar-dhawan-1

  • मोहाली येथे ऑस्ट्रेलियाविरधात धवनने तडाखेबंद फलंदाजी करत 187 धावा ठोकलेल्या

14) रोहित शर्मा –

rohit-sharma

  • रोहितने वेस्ट इंडिजविरोधात कोलकाता येथे झालेल्या सामन्यात 127 धावा केल्या होत्या.