कोलकात्यात लवकरच पाण्याखालून धावणार ट्रेन, देशातील पहिलाच प्रकल्प

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नवी दिल्ली

कोलकात्यात लवकरच पाण्याखालून ट्रेन धावणार आहे. देशातील हा पहिलाच प्रकल्प असून या प्रकल्पाचे काम पूर्ण होत आले आहे. हा प्रकल्प मेट्रो लवकरच कार्यान्वित करणार असल्याची माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.

कोलकात्यातील हुगली नदीतून या प्रकल्पांतर्गत ट्रेन धावणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून भारतीय रेल्वे इंजिनीयरिंगचा एक उत्तम नमुना सादर करणार असून दळणवळण क्षेत्रातील हे अत्यंत महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. तसेच कोलकात्यातील लोकांसाठी ही अत्यंत अभिमानास्पद बाब ठरेल असेही गोयल यांनी म्हटले आहे. 16 किलोमीटर लांबीचा हा कोलकाता मेट्रोचा प्रकल्प असून यात नदीतून जाणार्‍या बोगद्याला चार थरांचे संरक्षण असणार आहे.