
सामना ऑनलाईन । जकार्ता
हिंदुस्थानच्या सायना नेहवालने इंडोनेशिया मास्टर्स स्पर्धा जिंकली. इंडोनेशिया मास्टर्स जिंकणारी ती पहिली हिंदुस्थानी महिला खेळाडू ठरली आहे. अंतिम फेरीत सायना आणि कॅरोलिना मरिन यांच्यात सामना सुरू असताना कॅरोलिनाला दुखापत झाल्यामुळे तिने माघार घेतली आणि सायना विजयी झाली. सामन्याच्या पहिल्या सेटमध्ये कॅरोलिना मरिनने चांगली सुरुवात केली होती. मरिनकडे 10-4 अशी आघाडी होती. एका रॅलीदरम्यान कॅरोलिना पडली आणि तिचा पाय दुखावला. तिला डॉक्टरांची मदत घ्यावी लागली. तपासणीत लक्षात आले की, ती पुढे खेळू शकणार नाही. यानंतर मरिनने सामन्यातून माघार घेतली. कोर्ट सोडत असताना मरिनला अश्रू अनावर झाले होते.
.@NSaina wins her ❺ #IndonesianMasters
An emotional grand finale at the #DaihatsuIndonesiaMasters: leading 10-4 in the game1 @CarolinaMarin incurred a knee injury following an awkward leap rendering her unable to continue as @NSaina lifted her 5th title. #IndiaontheRise pic.twitter.com/i96Us5z4vE
— BAI Media (@BAI_Media) January 27, 2019


























































