उड्डाण घेण्याआधीच इंडिगोच्या विमानात उंदिर घुसला, कानपूर विमानतळावर प्रवाशांचा एकच गोंधळ

indigo

कानपूर विमानतळावरून दिल्लीला जाणारे इंडिगोचे विमान उड्डाणाच्या तयारीत असतानाच प्रवाशांनी अचानक आरडाओरडा सुरू केला. प्रवाशांनी विमानात उंदिर पाहिला आणि एकच गोंधळ उडाला. तात्काळ सर्व प्रवाशांना विमानातून खाली उतरवण्यात आले. विमानाची तपासणी सुरू करण्यात आली.

इंडिगोचे विमान दुपारी 2.15 वाजता दिल्लीहून कानपूरला पोहचले. यानंतर दुपारी 2.55 वाजता हे विमान कानपूरहून पुन्हा दिल्लीकडे रवाना होणार होते. विमान उड्डाण घेण्याच्या तयारीत असतानाच प्रवाशांना आत उंदिर दिसला आणि प्रवाशांनी आरडाओरडा सुरू केला. विमानतळ कर्मचाऱ्यांना घटनेची माहिती देण्यात आली. यानंतर प्रवाशांना विमानातून उतरवण्यात आले. विमानतळ कर्मचाऱ्यांनी विमानाची तपासणी सुरू केली. या घटनेमुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला.