इंडोनेशियात शंभर डॉक्टरांचा कोरोनामुळे मृत्यू, जगात अडीच कोटी कोरोनाबाधित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जगात कोरोनाने हाहाकार माजविला असून 2 कोटी 54 लाख 14 हजार 924 नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. यातील 1 कोटी 77 लाख 24 हजार 73 नागरिकांनी कोरोनावर मात केली आहे तर 8 लाख 51 हजार 92 नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

जगभरात 68 लाख 39 हजार 759 नागरिकांवर उपचार सुरू आहेत. इंडोनेशियात कोरोनावर उपचार करणाऱ्या शंभरपेक्षा जास्त डॉक्टरांना आपला जीव गमवावा लागला आहे. इंडोनेशियात रविवारी 2 हजार 858 नागरिकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे.