गंगा अवतरण दिनी अलंकापुरीत इंद्रायणी नदीचे पूजन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जेष्ठ शुद्ध दशमीला गंगानदी पृथ्वीवर अवतरल्याचे मानण्यात येते. या जनकल्याण पर्वाचे स्मरण म्हणून देशात दहा दिवस गंगा दशहरा साजरा केला जातो. या पर्वावर तीर्थक्षेत्र आळंदीतील इंद्रायणी नदीचे पूजन , धार्मिक परंपरा जोपासत उत्साहात करण्यात आले. यावेळी श्रींचे पुजारी मुरलीधर प्रसादे यांनी पौरोहित्य केले.

अनेक भाविक तीर्थयात्रा केल्यानंतर गंगापूजन करतात. जेष्ठ शुद्ध दशमीला गंगेच्या अवतरण दिनानिमित्त इंद्रायणी नदीचे जलपूजन करीत गंगापूजन करण्यात आले. या प्रसंगी ज्ञानेश्वर महाराज संस्थांनचे माजी व्यवस्थापक श्रीधर सरनाईक, ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अजित वडगावकर,ज्ञानेश्वर महाराज चरित्र समितीचे विश्वस्त प्रकाश काळे, विलास वाघमारे, विशेष कार्यकारी अधिकारी संकेत वाघमारे, अण्णा गवारी, विश्वंभर भाऊ पाटील, शिक्षण मंडळाचे माजी सदस्य मुरलीधर प्रसादे आदि उपस्थित होते.