भारीच की! 6 जीबी रॅम व 5200mAh ची दमदार बॅटरी, 10 हजारांहून कमी किंमतीत मिळतोय ‘हा’ स्मार्टफोन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानमधील स्मार्टफोनचा बाजार दिवसेंदिवस फुलत आहे. जगभरातील कंपन्या या बाजारात आपली उत्पादने खपवण्यासाठी वेगवेगळ्या फीचर्स आणि परवडणाऱ्या किंमतीत स्मार्टफोन लॉन्च करत असतात. रविवार इंफिनिक्स कंपनीने आपला लेटेस्ट स्मार्टफोन ‘हॉट 10’ लॉन्च केला आहे. या फोनचे खास वैशिष्ट्य म्हणजे 6 जीबी राम आणि 5200mAh ची एकदम जबरदस्त बॅटरी.

स्मार्टफोनला 128 जीबी स्टोरेज देण्यात आले असून मेमरी कार्डच्या मदतीने हे स्टोरेज 256 जीबी पर्यंत वाढवता येते. फोटोग्राफीचा विचार केल्यास यात 4 रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला असून 16 मेगापिक्सलचा मेन सेन्सर कॅमेरा आहे. तसेच रात्रीही सेल्फी उत्तम यावा यासाठी ड्युअल एलईडी फ्लॅश देण्यात आली आहे.

images-2

दरम्यान, हा फोन ओब्सीडियन ब्लॅक, एम्बर रेड, मूनलाइट जेड आणि ओशियन वेव अशा 4 रंगात उपलब्ध असणार आहे. 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज असणारा हा स्मार्टफोन 16 ऑक्टोबर पासून विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. फ्लिपकार्टवर तुम्ही हा खरेदी करू शकता. याची किंमत 9,999 रुपये आहे.

फीचर्स

– इंफिनिक्स हॉट 10 स्मार्टफोनला 6.78 इंचाचा फुल व्यू-ओ डिस्प्ले देण्यात आला आहे

– एंड्रॉइड 10 ऑपरेटिंग सिस्टीम बेस्ड XOS 7.0 वर काम करतो

– 16 मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा, सोबत 8 मेगापिक्सलची मायक्रो लेन्स, 8 मेगापिक्सलचा एआई इन-डिस्प्ले सेल्फी कॅमेरा

– 5200mAh ची दमदार बॅटरी (फुल चार्ज केल्यावर 23 तास सलग व्हिडीओ पाहू शकता, 41 तास गाणे ऐकू शकता, 19 तास सलग गेम खेळू शकता)