
दक्षिण दिल्लीतील सफदरजंग भागात एका दिव्यांग तरुणाची हत्या केल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी 17 वर्षीय मुलाला अटक केली आहे. तो घरगडी म्हणून कामाला होता.
चोरी करताना पाहिल्यानंतर आणि मंदिरात गेलेल्या त्याच्या पालकांच्या अनुपस्थितीत अलार्म वाजवल्यानंतर अल्पवयीन मुलाकडून दिव्यांग तरुणाची हत्या करण्यात आली, असे पोलिसांनी सांगितले.
‘तू चोर में सिपाही’ या बॉलीवूड चित्रपटातून हा मुलगा प्रभावित होता, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. पोलिसांनी असेही म्हटले की अल्पवयीन आरोपीने चित्रपटात दाखवल्याप्रमाणेच काळ्या रंगाचे हातमोजे देखील सोडले होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृताच्या बहिणीने सांगितले की, तिचे आई-वडील आणि आजी मंदिरात गेले होते. तासाभरानंतर, ती तिच्या अपंग भावाला त्यांच्या नोकराकडे सोडून ग्रीन पार्क मार्केटमध्ये गेली, ज्याला त्यांनी तीन महिन्यांपूर्वी त्याची काळजी घेण्यासाठी कामावर ठेवले होते.
ती परत आली तेव्हा तिला तिचा भाऊ बेडवर बेशुद्ध अवस्थेत पडलेला आणि घरातील नोकर गायब असल्याचे दिसले. घराची तपासणी केली असता काही दागिने, मोबाईल फोन आणि सुमारे 40 हजारांची रोकडही गायब असल्याचे आढळून आले.
बिहारमधील सीतामढी येथील आपल्या गावी पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरून या अल्पवयीन मुलाला पकडण्यात आले. त्याच्या ताब्यातून चोरीचे दागिने व रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.
चौकशीदरम्यान, अल्पवयीन मुलाने पोलिसांना सांगितले की त्याला त्याची साफसफाईची कामे करताना अपमानास्पद वाटले आणि तो निघून जाऊ इच्छित होता. जाण्यापूर्वी पैसे कमवण्यासाठी त्याने घर लुटण्याचा बेत आखला, परंतु दिव्यांग तरुणाने त्याला कृत्य करताना पाहून आवाज केला केला तेव्हा त्याने त्याची हत्या केली.




























































